आतापर्यंत 73 हजार जणांची झाली तपासणी, 4,140 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ात आतापर्यंत 73 हजार 830 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून 62 हजार 247 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण बाधितांची संख्या 10 हजारच्या जवळपास पोहोचली आहे. बरे होणाऱया रुग्णांची संख्याही 5 हजाराच्यावर आहे.
शुक्रवारी जिल्हय़ातील आणखी 304 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 143 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरांतील 99 व ग्रामीण भागातील 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर गेल्या 24 तासांत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 9 हजार 447 वर पोहोचली आहे. यापैकी 5 हजार 206 जण कोरोनामुक्त झाले असून यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर 4 हजार 140 सक्रिय रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
1201 अहवाल प्रलंबित
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्हय़ातील पाऊण लाख जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 25 हजार 513 जण होम केअरमध्ये आहेत. आणखी 1201 अहवाल प्रलंबित असून शनिवारी सायंकाळपर्यंत हे अहवाल उपलब्ध होणार आहेत. सध्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एक-दोन दिवसात बाधितांची संख्या दहा हजारवर पोहोचणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात 192 जण बरे झाले आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोनामुळे 151 जण दगावले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा अनेकपटीने अधिक आहे. बेळगाव शहर व तालुक्मयातही मृतांचा आकडा वाढता आहे.
शुक्रवारी मुतगा, अगसगे, चंदूर, कंग्राळी खुर्द, बेळगुंदी, काकती, मण्णूर, हुदली, सांबरा, मच्छे, पंतबाळेकुंद्री, बेनकनहळ्ळी, हिरेबागेवाडी, सुळेभावी, मुत्नाळ, बेन्नाळी, गणेशपूर, वडगाव, सहय़ाद्रीनगर, महांतेशनगर, एसपीएम रोड, हनुमाननगर, भाग्यनगर, हिंदवाडी, अनगोळ, ताशिलदार गल्ली, कडोली परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आंबेडकरनगर, समादेवी गल्ली, रेणुकानगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, जाधवनगर, विजयनगर, वीरभद्रनगर, वडगाव, खासबाग, शहापूर, शास्त्राrनगर, गोंधळी गल्ली, न्यू गांधीनगर, हिंडलगा, गुरुप्रसादनगर, चिदंबरनगर, आझमनगर, टिळकवाडी, नानावाडी, टीव्ही सेंटर, कॅम्प परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
डॉक्टर, कर्मचाऱयांना लागण
शहरातील सरकारी व खासगी इस्पितळातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होण्याचे प्रकार सुरूच आहेत. शुक्रवारी राज्य राखीव दलाच्या एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर आयटीबीपीच्या चार जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतबाळेकुंद्री देवस्थान परिसरातील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.









