दोघांचा मृत्यू तर 610 सक्रिय
प्रतिनिधी / ओरोस:
मंगळवारी जिल्हय़ात 71 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 23 वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 610 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. तसेच आतापर्यंत एकूण 725 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मृत्यू झालेल्यांपैकी एक रुग्ण हा कणकवली बाजारपेठेतील 70 वर्षीय वृद्ध होता. तर दुसऱया रुग्णाबाबतची माहिती
प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही.
नव्याने रुग्ण आढळून आलेले भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 26 ठिकाणांचा समावेश आहे. कणकवली तालुक्मयातील हळवल कुंभरगाळू येथील रोहित चंद्रकांत कुबल हे राहत असलेले घर व 50 मीटर परिसर, कासार्डे आनंदनगर-बंडवाडी येथील 150 मीटर परिसर. कणकवली शहरात भालचंद्रनगर येथील कमलाकर जगन्नाथ निर्गे यांचे घर परिसर. कणकवली शहरात अमोल निवृत्ती माने राहत असलेले ओम बाबा भालचंद्र अपार्टमेंट बिल्डींग व परिसर. सोनगेवाडी येथील डॉ. संजय भिकाजी मराठे हे राहत असलेले घर व परिसर 13 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
कणकवली तालुक्मयातील दारिस्ते-बौद्धवाडी येथील वनिता नारायण कदम हे राहत असलेले घर व परिसर. जांभूळगाव येथील मंतेष भीमसा जमादार हे राहत असलेले घर व परिसर. कलमठ लक्ष्मणनगर येथील संजीव सुहास गोगटे हे राहत असलेले घर व परिसर. कनेडी शिवाजीनगर येथील स्मिता ईलियास डेसा हे राहत असलेले घर व परिसर. दारुम मधलीवाडी येथील 300 मीटर परिसर. खारेपाटण कर्लेवाडी येथील दिलीप जगन्नाथ कर्ले यांचे राहते घर व 50 मीटर परिसर, नाटळ येथील साईलीला हॉस्पिटल दुसरा मजला स्टाफ क्वार्टर परिसर, फोंडा-गांगोवाडी येथील सिध्दार्थ मनोहर परब यांचे राहते घर व 100 मीटर परिसर, सांगवे-शिवाजीनगर, सुतारवाडी येथील सायली भास्कर सुतार या राहत असलेले घर परिसर 12 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरात न्यू खासकीलवाडा येथील वार्ड ई-333, अ ही इमारत व पूर्वेस 0.60 मीटर, पश्चिमेस 4 मीटर, उत्तरेस 2 मीटर, दक्षिणेस 4 मीटरचा परिसर, उभाबाजार येथील घर क्र. जी-398 व घराच्या पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण दिशांच्या 60 चौरस मीटरचा परिसर 10 सप्टेंबरला रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सबनीसवाडा येथील म्युनिसिपल घर क्र. डी-59 व चहुबाजूचा सुमारे 80 चौरस मीटर परिसर, सालईवाडा येथील घर क्रमांक अ-171 चा पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण दिशांचा 40 चौरस मीटर चहूबाजूचा परिसर 11 सप्टेंबरला रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरात खासकीलवाडा नवीन इमारत, कोठावळे पाणंद येथील घर
क्रमांक एफ-1, पहिल्या मजल्याचा परिसर, इन्सुली-कुडवटेंब येथील घर क्रमांक 726 (50 मीटर) चा परिसर, सावंतवाडी तालुक्मयातील बावळाट-चिलेवाडी येथील घर क्रमांक 483 (50 मीटर) चा परिसर, उभाबाजार येथील निर्मला-विठ्ठल प्लाझा पहिल्या मजल्यावरील रुम नं. 107 चा परिसर, सावंतवाडी शहरात सालईवाडा येथील रो हाऊस वार्ड ए एफ क्र. 291 क्मयू इमारतीचा तळमजला, पहिला मजला व या इमारतीच्या पूर्व बाजूस 1 मीटर, पश्चिम बाजूस 2 मीटर, उत्तर बाजूस 1 मीटर व दक्षिण बाजूस 3 मीटरचा परिसर 12 सप्टेंबर रोजी रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरात खासकीलवाडा ज्युस्तिननगर येथील घर क्र. ई-167/जी घराचा पहिला मजला चहूबाजूचा परिसर 13 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
देवगड तालुक्मयात मणचे मुस्लीमवाडी येथील मुकद्दर इस्माईल सोलकर राहत असलेले 1 घर 5 कुटुंब, 22 लोकसंख्येपुरता परिसर, साळशी मिराशीवाडी येथील नामदेव नारायण कुबडे व नीलम नामदेव कुबडे यांच्या घरापुरता परिसर, समर्थ प्लाझा येथील चंदनकुमार नानू झा यांच्या घरापुरता परिसर 12 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित क्षेत्रातील उपविभागीय अधिकाऱयांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 14097
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 1358
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 12554
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 185
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 610
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 23
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 725
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 10447
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 11220
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 208125
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 221









