कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 884 : कोरोनामुक्त रुग्णसंख्या 849
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात शनिवारपर्यंत एकूण 849 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत 884 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आणखी 132 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 16240
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 1757
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 14186
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 297
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 884
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 24
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 849
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 9220
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4406
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 210563
रेल्वेने दाखल झालेले प्रवासी 3418
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 213









