-बुधवारी 15 रूग्णांना डिस्चार्ज : कोरोनाबाधित रूग्णसंख्या 8832
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्हय़ात बुधवारी 17 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आह़े त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 832 इतकी झाली आह़े बुधवारी 15 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत 8 हजार 313 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरटीपीसीआर चाचणीमध्ये रत्नागिरीमध्ये 8, दापोलीमध्ये 2 तर खेड, चिपळूण व संगमेश्वर येथे प्रत्येकी 1 असे नवे एकूण 13 रुग्ण आढळल़े तर रॅपिड अँटीजन चाचणीमध्ये रत्नागिरीमध्ये 2 तर चिपळूण व संगमेश्वर येथे प्रत्येकी 1 असे 4 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत़ तसेच मृत्यूचा आकडा 321 वर स्थिरावला आह़े रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.22 टक्के नोंदवण्यात आले आह़े
जिल्हय़ातील कोरोनाची स्थिती:
- एकूण रूग्ण-8832
- नवे रूग्ण -17
- नवे मृत्यू -0
- एकूण मृत्यू -321









