बुधवारी नवे 20 बाधित / 20 रूग्णांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / रत्नागिरी
बुधवारी प्राप्त अहवालानुसार 20 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून दापोलीतील दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेले काही दिवस घसरत असलेल्या रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ आणि मृत्यूला घातलेला लगामही सुटल्याने जिह्यातील नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दोन मृत्यूंची भर पडल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 324 झाली आह़े बुधवारी 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून जिह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 8 हजार 549 झाली आह़े बुधवारी नवे 20 रुग्ण सापडल्याने जिह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 993 झाली आह़े
बुधवारी आरटीपीसीआर चाचणीमध्ये रत्नागिरीमधील 6, गुहागर 3, चिपळूण 2, आणि संगमेश्वरमधील 1 असे 12 तर रॅपिड अँटीजन चाचणीमध्ये रत्नागिरी व दापोलीमध्ये प्रत्येकी 3, गुहागर व चिपळूणात प्रत्येकी 1 असे 8 याप्रमाणे 20 नवे रुग्ण सापडले आहेत़ उपचारादरम्यान दापोलीमधील अनुक्रमे 44 व 76 वर्षीय पुरूषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवाळीनंतर वाढू लागलेला कोरोना संसर्गाचे वेग गेल्या काही दिवसात नियंत्रणात आल्याचे सुखद चित्र निर्माण झाले होते. काही दिवस कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यातही आरोग्य विभागाला यश आले होते. मात्र बुधवारी या दोन्ही बाबतीत वाढत्या आकडेवारीने काळजी वाढली आहे.
जिल्हय़ातील कोरोनाची स्थिती:
एकूण रूग्ण-8993
नवे रूग्ण -20
नवे मृत्यू -02
एकूण मृत्यू -324









