प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात फलटण व पाटण येथे दोन ठिकाणी जुगार अड्डा चालवणाऱया करणाऱया चारजणांवर कारवाई करत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम 8 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहर पोलिसांनी फलटण येथे आखरी रस्ता येथे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डय़ावर छापा टाकून राहूल शिवाजी कापसे (वय 32, रा. मलटण) व रोहित दत्तात्रय पवार (वय 27, रा. बाणेवाडी, ता. बारामती) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील 5 हजार 60 रुपये रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
पाटण पोलिसांनी मरळी, ता. पाटण येथे कारखान्याच्या गेट समोरील टपरीच्या आडोशाने जुगार चालवणाऱया गणेश प्रकाश कांबळे (रा. मारुल हवेली, ता. पाटण) याच्यावर कारवाई केली. त्याच्या ताब्यातील 1 हजार 470 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तर त्याच परिसरात जुगार चालवणाऱया नथुराम बबन पाटसुते रा. मरळी, ता. पाटण याला ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातील एक हजार 230 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
दरम्यान, कराड तालुका पोलिसांनी तांबवे, ता. कराड येथे टाकलेल्या छाप्यात संभाजी रामचंद्र थोरात (रा. ओंड, ता. कराड) याच्यावर कारवाई केली. त्याच्या ताब्यातील 938 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.








