प्रतिनिधी/ सातारा
जिल्हावासियांकरिता शनिवार रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे. मागच्या पाच दिवसांपूर्वी 52 हजार जणांचे लसीकरण झाले होते त्याचे रेकॉर्ड मोडत 60 हजार 664 जणांनी लस घेतली आहे. तर जिह्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचा आकडा हा 54 एवढा आल्याने तो ही रेकॉर्ड झाले आहे. त्यात फलटण तालुक्यातील 17 तर माण तालुक्यातील 16 जणांचा कोरोनामुळे बळी घेतला आहे. बाधित आढळून येण्यामध्ये सातारा तालुक्याने पुन्हा फलटणला मागे टाकले आहे. तब्बल 54 बळी आल्याने जिल्हा धास्तावला असला तरी हे मृत्यू एका दिवसातील आहेत की मृत्यू नोंदीतही पुन्हा अपलोड घोटाळा झाला आहे हे प्रशासनाने स्पष्ट करण्याची गरज आहे. दरम्यान, दोन्ही डोस घेतलेल्यामध्ये बाधित होण्याचे प्रमाण दि. 4 ऑगस्टपासून दि. 20 ऑगस्टपर्यत केवळ 24 टक्के एवढे आहे.
सातारा शहरात शनिवारी 1873 जण टुचुक
जिह्यातील लसीकरणाचे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा शनिवारी सकाळपासून सज्ज होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सर्व यंत्रणाचे नियोजन केले होते. सकाळी 8 पासूनच लसीकरण सुरू झाले. रात्री 7.30 पर्यंत सातारा शहरात जिल्हा रुग्णालयात 445 जण, गोडोली केंद्र 749 जण, कस्तुरबा केंद्र 679 जण असे 1873 जणांनी टुचुकचे लाभार्थी झाले. तर सगळ्यात कमी लसीकरण हे सातारा तालुक्यातील काशिळ या केंद्रावर झाले असून केवळ 1 जणांने लस घेतली. जिह्यातील 60 हजार 664 जणांनी एका दिवसात लसीकरण घेतले आहे. आतापर्यंत 16 लाख 25 हजार 793 जण लाभार्थी झाले असून त्यापैकी पहिला डोस 11 लाख 34 हजार 673 जणांनी तर दुसरा डोस 4 लाख 91 हजार 120 जणानी घेतला आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.
16 दिवसात दोन लस घेतलेले 2979 बाधित जिह्यातील दि. 4 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान 12 हजार 269 जण बाधित आढळून आले त्यापैकी पहिला डोस घेतलेले 1868 तर दुसरा डोस घेतलेले 1111 असे दोन्ही डोस 2979 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जावली तालुक्यातील दोन्ही डोस घेतलेले 114 जण बाधित, कराड तालुक्यातील 395 जण, खंडाळा तालुक्यातील 106 जण, खटाव तालुक्यातील 311 जण, कोरेगाव तालुक्यातील 280 जण, माण तालुक्यातील 143 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 19 जण, पाटण तालुक्यातील 49 जण, फलटण तालुक्यातील 513 जण, सातारा तालुक्यातील 864 तर वाई तालुक्यातील 185 जण बाधित आले असून हे प्रमाण 24 टक्के एवढे आहे, असे ही जिल्हा आरोग्य अधिकारी









