नियमभंग प्रकरणी 46 लाखाचा दंड
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू केलेल्या संचारबंदी मोडून अनावश्यक बाहेर पडत वाहतूकीच्या नियमांचा भंग करणाऱया 13 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. केवळ 27 दिवसांत वाहनचालकांकडून तब्बल 46 लाख रूपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे. शुक्रवारी एकाच †िदवशी 650 जणांवर कारवाई करत 2 लाख 23 लाख रूपयांचा दंड ठोठावल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांनी दिल़ी
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे 22 मार्च ते 17 एप्रिल 2020 या काळात ही कारवाई करण्यात आल़ी यामध्ये विनाहॅल्मेट प्रवास करणाऱया 5 हजार 941 जणांना 29 लाख 70 हजार 500 तर सीट बेल्ट न वापरणाऱया 517 कारचाकांकडून 1,03,400 रूपये दंड वसूल करण्यात आला. अनावश्यक फिरणाऱया 2 हजार 600 जणांविरूद्ध करण्यात आलेल्या कारवाईत 5 लाख 24 हजार रूपयांचा दंड ठोठाविण्यात आला आह़े
कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आल़ी मात्र संचारबंदीचे उल्लंघन करून बाहेर पडणाऱयांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलण्यात आल़े
वाहतूक पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांच्या नेतृत्वाखाली जिह्यात विविध ठिकाणी बेशिस्तपणे फिरणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल़ा अनेक चार चाकी व दुचाकी वाहने पोलिसांकडून जप्त करण्यात आली आह़े या वाहनचालकांचे परवाने 3 महिन्यांसाठी निलंबित देखील करण्यात आले आहेत़ जप्त करण्यात आलेली वाहने जिल्हा पोलीस मुख्यालय मैदानात ठेवण्यात आली असून 3 महिन्यापर्यंत ती पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहेत़
लॉकडाऊनच्या काळात विनापरवाना वाहने चालविण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसून येत आह़े विनापरवाना फिरणाऱया 205 वाहनधारकांकडून 1 लाख 2 हजार 500 रूपयांचा दंड लावण्यात आला आह़े रत्नागिरी जिह्यात कारोनाचे एकूण 6 रूग्ण सापडले असून संचारबंदीची काटेकार अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे रस्त्यावरची वर्दळ कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आह़े कठोर कारवाईमुळे विनाकारण रस्त्यावर फिरणऱयांच्या सख्येत घट होईल अशी आशा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आह़े









