प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 247 नवे रूग्ण आढळून आले आहेत़ तर 9 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत घट होत असल्याचे दिसत आह़े यामुळे जिह्यातील कोरोनाची चैन तुटण्याची आशा निर्माण झाली आह़े आता 3 हजार 6 रूग्ण उपचारात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जिह्यात 4 हजार 329 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 97 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 150 असे 247 कोरोना रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 67 हजार 976 इतकी झाली आह़े तर 59 बरे झालेल्यांना घरी सोडण्यात आल़े जिह्यातील एकूण बरे झालेल्यांची संख्या आता 62 हजार 398 इतकी असून बरे होण्याचे प्रमाण 2.87 इतके आह़े तसेच मागील 24 तासांमध्ये 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े मृतांमध्ये खेड-1, दापोली-2, चिपळूण-1, रत्नागिरी-3, राजापूर-1, लांजा-1 असा समावेश आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 938 इतकी झाली आह़े तर रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर हा 2.87 इतका आह़े मागील काही दिवसांपासून जिह्यात कोरोनामुळे होणाऱया मृतांचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आह़े
आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी दर 7.74 असून सामान्य पॉ†िझटिव्हीटी दर 5.71 इतका आह़े जिह्यामध्ये शुक्रवार सायंकाळपर्यंत उपचारात 3 हजार 6 रूग्ण आहेत़ यामध्ये 1 हजार 423 रूग्ण गृहविलगीकरणात तर 1 हजार 583 रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.









