जिल्हाधिकाऱयांची माहिती, विनामास्क फिरणाऱयांकडून 70 लाखांचा दंड वसूल
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोनाची टक्केवारी घसरली आहे. जुलैमध्ये 30 टक्क्मयांवर असलेली रुग्णसंख्या आता केवळ 1 टक्क्मयावर आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. दरम्यान, रविवारी जिल्हय़ातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
रविवारी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. 97.6 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे कोरोना आटोक्मयात आला असला तरी नागरिकांनी दुसरी लाट व फैलाव टाळण्यासाठी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोना थोपविण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर पाळण्याची सूचना वारंवार केली जाते. तरीही अनेक जण विनामास्क फिरतात. विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून जिल्हय़ातील 65 हजार जणांवर कारवाई करून 70 लाख 72 हजार 375 रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 825 वर पोहोचली असून सध्या 278 सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी टिळकवाडी, अनगोळ, क्लब रोड, शिवबसवनगर, सदाशिवनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप 2 हजार 962 अहवालांची प्रतीक्षा आहे.









