24 तासांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या 24 तासांत बेळगाव जिल्हय़ातील 77 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये सोमवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णाचा उल्लेख नव्हता.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 320 वर असून यापैकी 303 जण बरे झाले आहेत. तर 24 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. गेल्या 24 तासांत 77 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून प्रशासनाला आणखी 2 हजार 747 अहवालांची प्रतीक्षा आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 25 हजार 473 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. तर 9 हजार 655 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 24 हजार 177 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 20 हजार 583 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान बिम्स्चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून कोणालाही डिस्चार्ज देण्यात आला नाही. तर दोघा जणांवर आयसीयुमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
लग्न समारंभात झाली कोरोनाची लागण
सिंगारकोप्प (ता. सौंदत्ती) येथील एका तरुणीला कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली? याचा उलगडा झाला आहे. या 22 वषीय तरुणीला दोन दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. रामदुर्ग तालुक्मयातील कल्लूर येथे 13 जून रोजी मैत्रीणीच्या विवाह समारंभात भाग घेण्यासाठी ही तरुणी गेली होती. सिंगारकोप्प येथील 70 वऱहाडी तेथे पोहोचले होते. याच कार्यक्रमाला मोरब (ता. नवलगुंद) तेथील वऱहाडी आले होते. मोरबमधील वऱहाडींमुळे सिंगारकोप्पच्या तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. या प्रकारामुळे सिंगारकोप्प व कल्लूर ही दोन्ही गावे सीलडाऊन करण्यात आली असून विवाहात भाग घेतलेल्या वऱहाडींना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.









