प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ातील जे स्थलांतरीत मजूर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छूक आहेत त्यांनी https://migrant.mahabocw,in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
स्थलांतरीत मजुरांच्या अडचणींबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या नोंदणीकरिता https://migrant.mahabocw,in/migrant/form हे संकेतस्थळावर तयार केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील स्थलांतरीत मजूर यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छूक आहेत, त्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास काही अडचणी असल्यास मदत कक्ष अथवा कामगार अधिकारी यांच्याशी संपर्क साधवा. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्थलांतरीत मुजरांच्या बाबतीत मदत कक्ष तयार करण्यात आला असून या मदत कक्षाचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय : 02362-228095, कुडाळ तहसील कार्यालय – 02362-222525, कणकवली – 02367-232025, सावंतवाडी – 02363-272028, मालवण – 02365-252045, वैभववाडी – 02367-237239, देवगड – 02364-262204, वेंगुर्ले – 02366-262053, दोडामार्ग – 02363-256518, कामगार अधिकारी – 02362- 228872.









