वकिलांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी लस देणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
जनतेला लवकरात लवकर लस उपलब्ध करावी, लसीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी जिल्हय़ातील जनतेला तातडीने लस देण्यासाठी पाऊल उचलावे. 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोसही द्यावा, तसेच इतर सर्वांना पहिला डोस द्यावा, अशी मागणी वकिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सरकारने 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना 21 जूनपासून डोस देण्याचे जाहीर केले आहे. मात्र 45 वयाच्या व्यक्तींना दुसरा डोस देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूचे प्रमाण कमी व्हायचे असेल तर लस देणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन वकिलांनी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱयांनी जिल्हय़ामध्ये लस उपलब्ध असल्याची आकडेवारी दाखविली. जे कोण लस घेण्यासाठी येत आहेत त्यांना आम्ही तातडीने लस देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तरी देखील वकिलांनी अनेक ठिकाणी लसचा तुडवडा जाणवत आहे. याचबरोबर लस घेण्यासाठी वेगवेगळय़ा अटी घालण्यात येत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. तेव्हा योग्यप्रकारे लस देण्यासाठी नियोजन करावे आणि जनतेला सहकार्य करावे, अशी मागणी केली.
सदर निवेदन देण्यासाठी बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. पी. एस. रांगोळी,
ऍड. शरद पाटील, ऍड. महादेव शहापूरकर, ऍड. एम. एस. नंदी, संजू भोसले व इतर उपस्थित होते.









