बेळगाव, बैलहोंगल, हुक्केरीनंतर खानापूर तालुक्मयाचा क्रमांक : कलादगी यांचे कौतुक
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात उद्योग खात्रीतून कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रत्येक तालुक्मयाला एक उद्दिष्ट देण्यात येते. ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे चढाओढ असते हे प्रत्येक तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयाच्या कामावरून दिसून येते. बेळगाव तालुक्मयातील चार तालुक्मयांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. बेळगाव तालुक्मयाने 2020-21 सालातील संपूर्ण जिल्हय़ात पहिल्यांदा आपल्या कामाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती मिळाली आहे.
बेळगाव जिह्यात एकूण 125 लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत 117.09 लाखांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव तालुक्मयात एकूण 12.049 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तालुक्मयात उद्योग खात्री योजनेतून 12.49 लाख रुपयांचे काम झाले आहे. याचबरोबर या महिन्यातही काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बैलहोंगल येथे 8.12 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 8.72 लाखांचे काम पूर्ण केले आहे. हुक्केरी तालुक्याला 11.60 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 11.61 लाखांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे या चार तालुक्मयांतील कामांची उद्दिष्टे पूर्ण झाल्याने समाधान क्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनीही उद्योग खात्रीतून अनेक विकासकामांना चालना दिल्या आहेत. तलाव तसेच इतर कामे करून आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. बेळगाव तालुक्मयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणतीच कसर सोडली नव्हती. त्यांच्याकडे खानापूर तालुक्मयाचा प्रभारी कार्यकारी पदभार दिल्यानंतर त्यांनी तालुक्मयातील उद्योग खात्रीचे उद्दिष्टही पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. या कामी तालुका पंचायतीचे साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद यांचेही प्रयत्न मोलाचे आहेत.
बेळगाव, बैलहोंगल, हुक्केरी आणि खानापूर तालुक्मयांतील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आता अथणी, चिकोडी, कित्तूर, मुडलगी या तालुक्मयांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी धडपड सुरू आहे. सर्वात कमी काम मुडलगी येथे झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर इतर तालुक्मयातही ही कामे रेंगाळली आहेत. बुधवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार केवळ 4 तालुक्मयांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. आता उर्वरित तालुक्मयांतील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
तालुकानिहाय पूर्ण झालेले उद्दिष्ट (लाखात)
| तालुका | देण्यात आलेले उद्दिष्ट | पूर्ण झालेले उद्दिष्ट |
| अथणी | 11.38 | 11.19 |
| बेळगाव | 12.09 | 12.49 |
| बैलहोंगल | 8.12 | 8.72 |
| चिकोडी | 7.95 | 7 |
| गोकाक | 8.13 | 7.05 |
| हुक्केरी | 16.36 | 18.35 |
| कागवाड | 2.17 | 1.22 |
| खानापूर | 11.6 | 11.61 |
| कित्तूर | 4.68 | 4.2 |
| मुडलगी | 4.62 | 4.14 |
| निपाणी | 5.69 | 2.93 |
| रामदुर्ग | 9.77 | 8.93 |
| रायबाग | 11.3 | 10.01 |
| सौंदत्ती | 11.13 | 9.26 |
| एकूण | 125 | 117.09 |









