प्रतिनिधी /बेळगाव :
बेळगाव जिल्हय़ातील आणखी 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 271 वर पोहोचली आहे. सलग दुसऱया दिवशीही बेळगावला दिलासा मिळाला आहे.
राज्य आरोग्य विभागाने गुरुवारी सायंकाळी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार गेल्या 24 तासांत बेळगाव शहर व जिल्हय़ात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. बुधवारप्रमाणेच गुरुवारीही बेळगावला दिलासा मिळाला असून आरोग्य विभागाने स्वॅब तपासणीचा सपाटा वाढविला आहे.
तर बिम्स् प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव, हुक्केरी, चिकोडी, गोकाक व चंदगड तालुक्मयातील 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये लहान मुले व महिलांचाही समावेश आहे. रुग्ण क्रमांक 3139, 3671, 3692, 4560, 3674, 5019, 2101, 2806, 3713, 3718, 4064, 4549, 5388, 5397, 4555 हे पूर्णपणे बरे झाले आहेत.
यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 7, हुक्केरी तालुक्मयातील 4, चिकोडी तालुक्मयातील 2, गोकाक व चंदगड तालुक्मयातील प्रत्येकी 1 बाधितांचा समावेश आहे.









