भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत कामे
सांगली प्रतिनिधी
राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 2021-22 या वर्षासाठी असलेल्या अर्थसंकल्पीत तरतुदीतून शासनाने सांगली जिल्ह्यासाठी 10 कोटी 35 लाख रूपये कामांच्या अंदाजित रक्कमेस प्रशासकीय मंजुरी दिली असून 7 कोटी 24 लाख 50 हजार रूपये इतका निधी वितरीत केला आहे. अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
विविध गावातील कामांसाठी तालुकानिहाय मंजूर निधी व कंसात वितरीत केलेला निधी पुढीलप्रमाणे. कडेगाव – 1 कोटी 20 लाख (84 लाख), पलूस – 75 लाख (52 लाख 50 हजार), जत – 75 लाख (52 लाख 50 हजार), शिराळा – 10 लाख (7 लाख), तासगाव – 70 लाख (49 लाख), कवठेमहांकाळ – 50 लाख (35 लाख), खानापूर – 93 लाख (65 लाख 10 हजार), आटपाडी – 42 लाख (29 लाख 40 हजार), मिरज – 1 कोटी 30 लाख (91 लाख), वाळवा – 3 कोटी 50 लाख (2 कोटी 45 लाख) तर महानगरपालिका क्षेत्रासाठी – 20 लाख (14 लाख) रूपये. या निधीतून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधांमध्ये वाढ होईल.