अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार, 5 जून 2021 सकाळी 11.15
●आकड्यांचा घोळ उघडकीस आणल्याने ‘तरुण भारत’वर अभिनंदनाचा वर्षाव ●एका दिवसात 9607 तपासण्या ●पॉझिटीव्हीटी रेट 14.91 वर
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात प्रशासनाकडून झालेला आकडयांचा घोळ ‘तरुण भारत’ने उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाची ताराबंळ उडाली आहे. जिल्हावासियांकडून तरुण भारतवर कौतुकांचा वर्षाव सुरु आहे. कोरोना बाधितांचा शुक्रवारी रात्री बारा वाजता जाहीर झालेल्यांमध्ये काल दिवसभरात 1394 बाधित नव्याने आढळून आले आहेत. मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. नेमका ऍक्शन प्लॅन प्रशासनाकडून मृत्यू दर कमी करण्यासाठी काय राबवणार याकडेच आता उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, राज्यात मिशन बिगीन अगेन सुरु झाले पण साताऱ्यात कधी सुरु होणार याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागून आहेत. जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रार्दूभाव कमी येत असल्याचे चित्र दिसत आहे. गावोगावीही तेच चित्र आहे. मात्र, मृत्यूदर अजूनही तेवढाच असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण तेवढेच राहिले गेले आहे. तर बाधित होणाऱ्यांचे प्रमाण आता आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी दिवसभरात 1394 जण बधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1 लाख 73 हजार 479 एवढी झाली आहे.
अजूनही कोरोनाच्या संसर्गाची भिती कायमच आहे. आकडेवारी कमी होत असली तरीही बाधित होण्याचे प्रमाण तितकेसे कमी झालेले नाही. त्यामुळेच सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरामध्ये अजूनही कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटलेली दिसत नाही. ग्रामीण भागात मात्र कोरोना टेस्टींगचे कॅम्प घेतले जातात. त्यामध्ये पुढाऱ्यांची तपासणी न करता जे गावातील गरीब आहेत त्यांचीच तपासणी केली जात आहे. त्याततही तपासणीचे रिपोर्ट पाच पाच दिवस मिळत नाहीत, अशाही तक्रारी आहेत. ज्यांना लक्षणे आहेत पण रिपोर्ट नाहीत ते रिपोर्ट लवकर न येण्यामुळे मोकाट फिरत असतात. तर रिपोर्ट आल्यानंतर त्यांची लक्षणे गायब झालेली असतात, असा एकंदर प्रकार सध्या सुरु आहे. मृत्यूदर मात्र तेवढाच आहे. तो कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरीही त्यामध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आता प्रशासन नेमके काय करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
एका दिवसात तपासण्या 9607
जिल्ह्यात दि.4 रोजी 9607 जणांचे स्वॉब तपासणी केले. त्यामध्ये 1394 जण बाधित आढळून आले असून 14.51 पॉजिटीव्हीटी रेट आहे. त्यामध्ये डीएच सातारामध्ये 2193 जणांचे स्वाब घेतले. त्यापैकी 626 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ही आले असून 28.55 पॉझिटीव्हीटी रेट आहे.
केआयएमएसमध्ये 109 जणांचे स्वाब तपासणी केली त्यात 38 जण पॉझिटीव्ही आले असून 34.86 पॉझिटिव्हीटी रेट होता. खासगीत 882 जणांचे स्वाब तपासणी केले असून 122 जण बाधित आढळून आले. आरटीपीसीआरमध्ये 3184 जणांचे स्वाब तपासणी केले असून, त्यात 786 जणांचे अहवाल पॉझिटीव्ही आले. आरएटी 6423 जणांचे स्वाब तपासणी केले होते तर 608 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले.
“तरुण भारत”वर कौतुकाचा वर्षाव
आकडय़ांचा घोळ करुन जिल्हा प्रशासनाने जिल्हावासियांवर लॉकडाऊन लादला गेला आहे ही बाब तरुण भारतने सडेतोडपणे मांडली गेल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच पाचावर धारण बसली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नेमक्या काय उपाययोजना केल्या जातात, त्या उपाययोजनामध्येही घोळ असल्याबाबत अनेकांनी फोन करुन कैफियत मांडत तरुण भारतने जनतेच्या मनातील आवाज व्यक्त केल्याबाबत जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गावोगावीही उभी राहू लागली कोरोना केअर सेंटर
राज्य शासनाने होम आयसोलेशनमध्ये उपचार घेता येणार नाहीत असे आर्वजून सांगताच जिह्यात आता गावोगावी कोरोना केअर सेंटर उभी राहू लागली आहेत. त्यामध्ये रुग्ण उपचार घेवू लागले आहेत. एकूणच या सेंटरमध्ये रुग्ण बरेही होत आहेत. रुग्णांना या कोरोना केअर सेंटरचा आधार वाटू लागला आहे. मोठमोठय़ा काही गावातले विलगीकरण कक्ष नावाला असले तरीही छोटय़ा गावांमधील विलगीकरण कक्ष चांगल्या प्रकारे सुरु असून त्यांचे नियोजनही हॉस्पिलटपेक्षाही अधिक चांगले आहे.
शनिवारपर्यंत एकुण नमूने…..844646, बाधित…..173479, घरी सोडलेले…..151225, मृत्यू…..3801, उपचारार्थ….18449









