अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 26 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.45
● सक्रिय रुग्ण संख्या 150 पर्यंत
● रिकव्हरी रेट 97.50 पर्यंत
● नऊ तालुके निरंक
● सातारा 6, कराड 5
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील नव्याने होणारी बाधित वाढ 12 वर आलेली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा कोरोना मुक्त होईल अशी आशा आरोग्य विभागासह जिल्हावासियांना लागून राहिलेली आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी नऊ तालुके निरंक असून सातारा आणि कराड या दोन तालुक्यामध्ये केवळ 11 रुग्ण नव्याने बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याचा रिकवरी रेट हा 97 पॉईंट 50 वर आलेला आहे तर सक्रिय रुग्ण संख्या दीडशेच्या आसपास आहे. हे दिलासादायक चित्र आहे
जिल्ह्यातील नव्याने 12 जण बाधित
सातारा जिल्ह्यात नव्याने होणारी बाधीत वाढ शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. नव्याने आढळून येणारे रुग्ण हे संख्येने कमी यावे, जिल्हा कोरोना मुक्त व्हावा यासाठी आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश येत असून नव्याने आढळून येणारी बाधित वाढ ही कमी होताना आढळून येत आहे. शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जिल्ह्यामध्ये 1246 जणांचे स्वॅब तपासले गेले असून नव्याने 12 जण बाधित आढळून आले असून 0.96 पॉझिटिव्हीटी आलेला आहे.
जिल्ह्यात सक्रिय रुग्ण150 च्या आसपास
जिल्ह्यातील सध्या बाधित वाढ ही 12च्या ही खाली आलेली असून जे रुग्ण आहेत ते ठणठणीत बरे होत आहेत. सक्रिय रुग्ण 150 च्या आसपास असून त्यातील 20 च्या आसपास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.50च्या आसपास आहे.
नऊ तालुके निरंक
जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी आता कोरोनाला हद्दपार करण्याचे काम सुरू आहे. जावली, खटाव, माण, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, पाटण, फलटण, खंडाळा या नऊ तालुक्यात नव्याने कोणीही बाधित आढळून आलेला नाही तर सातारा तालुक्यात 6 तर कराड तालुक्यात 5 जण असे जिल्ह्यातील 11 व इतर जिल्ह्यातील 1 असे 12 जण बाधित आढळून आले आहेत.
शनिवारी
नमुने-1246
बाधित-12
शनिवारपर्यंत
नमुने-25,51,280
बाधित-278985
मुत्यु-6674
मुक्त-2,71,466









