अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार, 19 जून 2021, सकाळी 11 वाजता
● गावोगावी विलगीकरण कक्षात रुग्ण बरे होण्याची संख्या चांगली ● हळूहळू जिल्हा होतोय खुला, ‘तरुण भारत’चे सर्वसामान्यांकडून कौतुक
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काल दुपारी आदेश काढून जिल्हा सोमवारपासून खुला केला आहे. त्यामुळे ‘तरुण भारत’चे सर्वसामान्याकडून कौतुक होत आहे. शुक्रवारी दिवसभराचा रात्री 12 वाजता आलेल्या अहवालात जिल्ह्यातील 11262 जणांची स्वॅब तपासणी केली असून, त्यामध्ये 895 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात दररोज बाधित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी येत आहे. दररोज 11 हजारांच्या पटीत स्वॅब तपासणी केल्या जात आहेत. गावोगावी स्वॅब तपासणीचे शिबिर घेतले जात आहेत. त्यात बाधित होण्याचे प्रमाण अगदी नगण्य असे आहे. गेल्या पंधरा दिवसापासून बाधित होण्याचे प्रमाण हळूहळू कमी कमी येत आहे. शुक्रवारी दिवसभराचा रात्री 12 वाजता आलेल्या अहवालात 895 जण बाधित आढळून आले आहेत तर दिवसभरात 11262 जणांनी स्वॅब तपासणीला दिले आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, शनिवारी सकाळी चित्र दिसत होते. सातारा शहरासह जिल्ह्यात किराणा मालाच्या दुकानदारांनी आपली दुकाने उघडली होती तर काहींनी कारवाईच्या भीतीने बंद ठेवली होती. जिल्हा हळूहळू पूर्व पदावर येत असून ‘तरुण भारत’चे अभिनंदन होत आहे.
जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात बरे होण्याचे प्रमाण वाढले
जिल्ह्यात गावोगावी विलगीकरण कक्ष सुरू झालेले आहेत. त्या कक्षात गावागावातले बाधित उपचार घेत आहेत. त्यांना चांगले उपचार मिळत असून, बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.
शनिवारपर्यंत तपासले नमुने- 971590, बाधित-185266, आजपर्यंत मुक्त-172324, मृत्यू -4166









