कोल्हापूरजिल्ह्यातबारानव्यापॉझिटिव्हरुग्णांचीभर
जिल्ह्यात आज, बुधवारी दिवसभरात बारा नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडलीय. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 644 वर पोहचली. दुपारी सहा तर सायंकाळी सात वाजेपर्यंत आणखीन सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 282 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर कोरोनाने जिल्ह्रयात 6 जणांचा बळी गेला असून उर्वरित रुग्णांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.








