बेळगाव/ प्रतिनिधी
७४ वा स्वातंत्र्यदिन बेळगावच्या जिल्हा क्रीडांगणावर पार पडला. जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावर्षी कोरोनामुळे सोशल डिस्टन्स राखत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
पोलीस दलाचे शानदार पथसंचलन
कर्नाटक पोलीस दलाने शानदार पथसंचलन सादर केले. बँडच्या तालावर सुंदर पद्धतीने संचालन झाले. जिल्हा पोलिस, राज्य राखीव दल, वनविभाग, अबकारी विभाग, अग्निशमन व महिला पोलिसांनी या संचलनात भाग घेतला.पथसंचलनाचे नेतृत्व शिवानंद देवरगी यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ, जिल्हा पोलीस प्रमुख, राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी, बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा एहोळे यांच्यासह इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.









