प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी रात्रीपर्यत कोरोनाने 8 जणांचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 129 झाली आहे. सायंकाळपर्यत 172 रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामध्ये कोल्हापूर शहरातील 73 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये टेंबलाईवाडी येथील 52 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील खुपिरे येथील 75 वर्षीय वृद्ध, कळंबा येथील 55 वर्षीय पुरुष यांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये रेंदाळ येथील 51 आणि 48 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथील 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील 59 वर्षीय महिलेचा येथील डखासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. दरम्यान, रात्री उशिरा एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने 129 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत शहरात 73 पॉझिटिव्ह रुग्ण आले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 52 झाली आहे. शहरात आजपर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 25 जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्तांची संख्या 1 हजार 659 झाली आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 769 झाली आहे. आजपर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 हजार 556 झाली आहे.
दरम्यान, सकाळी 10 नंतर रात्री 9 पर्यत अनुक्रमे 6,3,2, 27, 24 आणि 3 असे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. दिवसभरात 65 पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची आजपर्यतची संख्या 4 हजार 621 वर पोहोचली आहे. रात्रीपर्यत 241 जण कोरोनामुक्त झाले. त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 1 हजार 900 पर्यत पोहोचली आहे. सोमवारी सर्वाधिक 241 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
कोल्हापूर शहरात माधुरी बेकरी 4, शिवाजी पेठ 1, उमा टॉकीज 6, राजारामपुरी 4, दिलबहार तालीम 2, फिरंगाई गल्ली 2, टिंबर मार्केट 2, आईचा पुतळा राजारामपुरी 3, दौलतनगर 1, रंकाळा टॉवर 8, यादवनगर 6, शिवाजी पेठ 6, रविवार पेठ 5, लक्ष्मीपुरी 2, अयोध्या अपार्टमेंट 1, विक्रमनगर 1, ताराबाई पार्क 1, संभाजीनगर 3, सीपीआर 2, टाकाळा 1, न्यू शाहूपुरी 1, राज्योपाध्येनगर 2, रविवार पेठ 2, कसबा बावडा 1, शारदा विहार 1, हरिओमनगर 1, सरदार कॉलनी 3, राजारामपुरी 1 यांचा समावेश आहे.
इचलकरंजीतील सिद्धार्थ हौसिंग सोसायटी 4, कोले मळा 1, जामदार मळा 1, यशवंत कॉलनी 4, पाटील मळा कबनूर 2, जिजामाता हौसिंग सोसायटी 1, रामनगर 1, सरस्वती मार्केट 1, राजेश्वरीनगर 4, मराठा चौक 1, जवाहरनगर 2, आमराई रोड 1, चंदुर रोड 1, दातार मळा इचलकरंजी 2, पन्हाळा 1, कणेरीवाडी 1, कोवाड चंदगड 1, करवीर तालुक्यात नंदवाळ 1, नागदेववाडी 2, संकेश्वर बेळगाव 1, गोकुळ शिरगाव 1, तारदाळ 1, हातकणंगले 6, शाहूवाडीतील कासार्डे 1, ओकली 4, येळणे 1, शित्तुर तर्फ मलकापूर 2, शित्तुर तर्फ वारुण 2, भुदरगड तालुका गारगोटी 2, सोनारवाडी 1 यांचा समावेश आहे.
आजअखेर 1659 जणांना डिस्चार्ज : डॉ. केम्पीपाटील
जिल्हय़ात सोमवारी 596 प्राप्त अहवालापैकी 373 निगेटिव्ह तर 157 पॉझिटिव्ह आले आहेत. अँन्टीजेन टेस्टिंगच्या 69 अहवालापैकी 42 निगेटिव्ह आणि 24 पॉझिटिव्ह असे 181 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आजअखेर 4 हजार 556 पॉझिटिव्हपैकी 1 हजार 659 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजअखेर जिह्यात 2 हजार 769 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी सोमवारी दिली.
सकाळी 10 वाजेपर्यंतच्या 182 पॉझिटिव्ह रूग्णांत भुदरगड 3, हातकणंगले 3, कागल 1, करवीर 3, शाहूवाडी 12, नगरपालिका क्षेत्र 63, महापालिका क्षेत्र 93 व इतर 3 असा समावेश आहे. आजअखेरतालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 107, भुदरगड 102, चंदगड 344, गडहिंग्लज 207, गगनबावडा 9, हातकणंगले 324, कागल 80, करवीर 515, पन्हाळा 196, राधानगरी 152, शाहूवाडी 260, शिरोळ 132, नगरपालिका क्षेत्र 1013, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 1052 असे 4493 आणि इतर 63 अशी 4556 रुग्णसंख्या आहे. जिह्यातील 4556 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 1659 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 129 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 2769 इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.








