अचूक बातमी “तरुण भारत” ची, शुक्रवार 11 मार्च 2022, सकाळी 11.45
● जिल्हयात 11 रुग्ण
● जिल्ह्यात सोमवारी 881 चाचण्या
● पॉझिटिव्हीटी 1.25 वर
● रुग्णालयात केवळ चार रुग्ण
प्रतिनिधी / कराड :
गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात सातारा जिल्ह्यात केवळ 11 रुग्ण बाधित आले आहेत. जिल्हय़ात गुरुवारी केवळ 48 रूग्ण उपचार घेत होते. रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे.
सक्रीय रुग्ण संख्या निच्चांकी
जिल्हय़ात पहिल्या दोन कोरोना लाटेत कोरोनाच्या एकूण रूग्णांचे आकडे मोठे होते. आता संसर्ग कमी झाल्याने सक्रीय रूग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. बुधवारी जिल्हय़ात केवळ 48 रूग्ण उपचारात होते. हा आकडा निच्चांकी पातळीकडे वाटचाल करत आहे.
केवळ चार रुग्ण रुग्णालयात
सक्रीय रुग्ण 48 असले तरी यातील केवळ चार रुग्ण प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
शुक्रवारी
नमुने-881
बाधित-11
शुक्रवारपर्यंत
नमुने-25,61,604
बाधित-2,79,136
मृत्यू-6,689
मुक्त-2,71,659