उपक्रमाचे उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्याकडून कौतुक
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हयात सुरु असलेल्या शेतकरी संपर्क मोहिमेचे विविध ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. शिरोळ तालुक्यात दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी स्वागत केले. शेतकरी संघ आणि झुआरी ऍग्रोने सुरु केलेली मोहीम कौतुकस्पद आहे. योग्य वेळी ही मोहीम सुरु केली असून जास्ती जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहवण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी स्वागत केल. सोमवारी शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यावर गणपतराव पाटील यांच्या उपस्थित कार्यक्रम झाला. यावेळी गणपतराव पाटील यांनी दत्त समुहाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. जमिनीचा पोत सुधाण्यासाठी अशा शेतकरी संपर्क मोहिमा काळाची गरज आहे. शिरोळ तालुक्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत आहे. यावर कारखान्याच्या माध्यमातून क्षरपडमुक्त जमिनीसाठी विविध उपाय सुरु आहेत. अशी माहिती दिली.
झुआरीचे महाव्यवस्थापक दिलीप चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सध्याची शेतीची पद्धत रासायनिक खतावर अवलंबून आहे. मात्र, ती योग्य मात्रेमध्ये दिली पाहिजेत. खत कंपन्यांनी केलेल्या शिफारशीनुसार खतांच्या मात्र देणे आवश्कय आहे. यासाठी शेतकरी प्रबोधन करण्यासाठीच शेतकरी संपर्क अभियान सुरु केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी यावेळी शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक गौराज, शिवगोंडा पाटील, रिजनल प्रमुख नागेश पाटील, मुख्य व्यवस्थापक सुहास फाळके, सहाय्यक व्यवस्थापक सुजित सानप, मार्केटींग व्यवस्थापक चेतन देशमाने आदी उपस्थित होते.









