– सर्वाधिक ई-लर्निंग अंगणवाड्या करवीर तालुक्यात होणार सुरु
राजेंद्र होळकर/इचलकरंजी
चार भिंती आणि साध्या बैठक व्यवस्थेमुळे अंगणवाड्यामधील बालकांचा ओढा कमी होऊन, खासगी संस्थाच्या प्ले ग्रुपसह ज्युनिअर व सिनिअर केजी शाळेकडे कल वाढला होता. मात्र जिह्यातील अंगणवाड्याचा लुक बदलत रंगकाम केलेल्या बोलक्या भिंती, आतील भीत्तीपत्रके, शुद्ध पाण्यापासून ते बैठक व्यवस्थेकरीता बेंच आदी भौतिक सुविधा आणि नव्याने सुरु होत असलेल्या `ई-लर्निंग’ सुविधेमुळे जिह्यातील 100 अंगणवाडÎांना अत्याधुनिक स्मार्टचा साज चढणार आहे.
अंगणवाडी हा शिक्षणाचा पाया आहे. हा पाया मजबूत झाल्यास पुढे शिक्षणाची इमारत डोलात उभी राहणार आहे. प्राथमिक स्तरावर मुलांचा शारीरिक व मानसिक आणि शैक्षणिक विकास होणार आहे. याकरीता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या धोरणाची महिला बालकल्याण विभागाने अंमलबजावणी सुरु केली असून, आता जिह्यातील शंभर अंगणवाडÎांमधून लहान मुलांना पूर्व प्राथमिक स्तरावर आनंददायी वातावरणामध्ये `ई-लर्निंग’ पूर्व उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.
सर्वाधिक `ई-लर्निंग’ अंगणवाडÎा करवीर तालुक्यात
जिह्यातील बारा तालुक्यात 16 एकात्मिक बालविकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडÎा सुरु आहेत. या सोळापैकी करवीर तालुक्यात सर्वाधिक तीन आणि त्याच्या खालोखाल हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यात प्रत्येकी दोन तर चंदगड, गडहिंग्लज, आजरा, कागल, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी या नऊ तालुक्यात प्रत्येकी एक असे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रत्येक प्रकल्पामधील सहा गावातील अंगणवाड्यामध्ये `ई-लर्निंग’ सुरु होणार आहेत. अशा 18 `ई-लर्निंग’ अंगणवाड्या जिह्यात सर्वाधिक करवीर तालुक्यात त्यानंतर 12 अशा अंगणवाड्या हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात सुरु होत आहेत. अशा अंगणवाड्यामुळे तीन ते सहा विशेषत: पाच ते सहा वयोगटातील बालकांना उत्कृष्ट दर्जाचे पूर्व प्राथमिक शिक्षण मिळणार आहे.
`डिजिटल’ अंगणवाड्यामध्ये या असणार `सुविधा’
भारनियमनाची समस्या असल्याने स्मार्ट अंगणवाड्यांना सौर ऊर्जेवर आधारीत सोलर लाईट सिस्टीम (सोलर पॅनल, इन्व्हर्टर, टÎूब, पॅन, बॅटरी), एज्युकेशनल पेटींग, प्रिंटीग चार्टस, ई लर्निंग हार्डवेअर, सॉफ्टवेअर, 32 इंची टिव्ही, पेन ड्राईव्ह, डेस्क फ्लोअर सिस्टीम, स्वच्छ भारत किट (लिक्वीड साबण, साबण, वॉटर बॉटल, हात रुमाल, कंगवा, नेल कटर, क्लिनींग पावडर), वॉटर प्युरीफायर, हँड वॉश बेसीन आणि मुलांना बसण्यास बेंच अशा वस्तुचा संच देण्यात आला आहे. भौतिक सुविधेसह शैक्षणिक साहित्य आणि ई-लर्निंग सुविधेमुळे अंगणवाड्यांचा दर्जा उंचवण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडÎांमध्ये मुलांच्या पटसंख्येतही निश्चित वाढ होणार आहे.









