अचूक बातमी “तरुण भारत” ची,
रविवार, 6 जून 2021, सकाळी 11.30
● शनिवारी रात्री 1,188 जण बाधित
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 11.60
● 10,241 जणांचे नमुने तपासले
● जिल्ह्यात 2,274 बेड शिल्लक
● प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 2,546 रुग्ण
● नवीन आदेशाकडे सर्वांचे लक्ष
● मान्सून सुरू झाला पेरण्या रखडल्या
सातारा / प्रतिनिधी :
ऐन थंडीत दुसरी लाट येणार म्हणून घाबरलेल्या सातारा जिल्ह्यात दुसरी लाट त्यावेळी आलीच नाही. उलट रुग्ण संख्या घटली आणि जगरहाटी सुरू झाली होती. कडक उन्हाळा सुरू झाला आणि तळपत्या उन्हात पुन्हा कोरोना संसर्गाने अक्षरशः कहर केला. गतवर्षीपेक्षा भयंकर स्थिती निर्माण झाल्याने सातारवासीयांना नेमके काय चालले आहे ते कळायचे बंद झाले. आता त्यात नेमके काय होत होते याचा लेखाजोखा ‘तरुण भारत’ ने मांडला आहे. तेव्हापासून गेले तीन-चार दिवसात प्रत्यक्ष व कागदोपत्री असलेल्या बाधित वाढीचा वेग मंदावू लागल्याचा दिलासा नागरीकांना मिळत आहे. शनिवारी रात्री च्या आवाजात फक्त 1,188 जणांचा आलेला आहे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 11.60
शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 10,241 जणांचे नमुने तपासण्यात आल्यानंतर 1,118 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 11.60 नमूद करण्यात आलेला आहे. यामध्ये 7,600, जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये 572 जणांचा अहवाल बाधित असून 7.53 असा पॉझिटिव्ह तिचा दर आहे. तर 2,641 जणांची rt-pcr टेस्ट करण्यात आली असून यामध्ये 616 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे त्यामुळे rt-pcr नुसार पॉझिटिव्हिटी रेट 20.58 एवढा आहे.
लॉकडॉऊन अजून दोन दिवस
जिल्ह्यातील स्थिती प्रचंड भयंकर झाल्याचे पाहून जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी पुन्हा आठ दिवसांचा लॉकडाउन जिल्ह्यावर लादला होता दिला होता अशी नागरिकांची भावना आहे. तो लॉकडाऊन दिनांक 8 जून पर्यंत असून आता आणखी दोन दिवस लोकांना घरातच बसावे लागणार आहे. मात्र जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू असून अनेकांना दुकाने कधी उघडतील याची वाट पाहावी लागली आहे निदान अत्यावश्यक किराणा भाजीपाला तरी सुरु करा लोकांना जगू द्या अशी त्यांची मागणी आहे. आता आठ तारखेला निर्बंध शिथिल करणार? या निर्णयाकडे जिल्हावासियांचे डोळे लागलेले आहेत.
जिल्ह्यात 2,274 बेड शिल्लक
जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये शनिवारच्या अहवालानुसार प्रत्यक्ष दवाखान्यात 2,546 एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्व डीसीएच, डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये एकूण 4,820 बेड उपलब्ध आहेत. आजमितीस त्यातील 2,274 एवढे बेड रिक्त आहेत. ही स्थिती दिलासादायक असून सध्या बेडसाठी नागरिकांची होणारी पळापळ थोडी थांबली आहे.
मान्सून सुरू झाला, पण पेरण्या रखडल्या
जिल्ह्यात या वर्षी पावसाने चांगलाच जोर लावला आहे. शनिवारी मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याचे बोलले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोकडाऊन मुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कणा चांगलाच मोडला आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित कृषी केंद्रे सुरू ठेवली असली तरी आणि इंधन देणार असे जरी प्रशासन सांगत असले तरी पोलिस जागोजागी शेतकऱ्यांच्या पोराला नाडत आहेत. जो ट्रॅक्टरसाठी डिजल आणायला निघालेला असतो त्याची तपासणी केली जात आहे. त्याचा लायसन मागितली जात आहे.
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 844646
एकूण बाधित 173479
घरी सोडलेले 154148
मृत्यू 3828
उपचारार्थ रुग्ण 15490
शनिवार जिल्ह्यात
एकूण बाधित 1394
एकूण मुक्त 2923
एकूण बळी 27









