अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 11 जानेवारी 2022, सकाळी 11.00
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 15.04
● काल दिवसभरात 2513 जणांचे स्वॅब तपासले
● बाधित वाढ रोखण्यासाठी प्रयत्न
● पोलिसांच्या तपासणीमुळे प्रत्येकांच्या खिशात लसीकरणाचे प्रमाणपत्र
सातारा / प्रतिनिधी :
मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जिल्ह्यातील 2513 जणांचे स्वॅब तपासणी गेल्या 23 तासात करण्यात आले होते. त्यामध्ये 378 जण नव्याने कोरोना बाधित आढळून आले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 15.04 वर आलेला आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सूचित केल्यानुसार जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. नागरिक ही स्वतःहून लस घेत आहेत. लस नसलेल्यांना जिथे तिथे अडवले जात असल्याने नागरिक लसीकरणाचे प्रमाणपत्र जवळ बाळगत आहेत.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 15.04 वर
डिसेंबर महिना जिल्हा वासीयांना सुखद होता. मात्र, जानेवारी महिना सुरू होताच पॉझिटिव्हीटी वाढत राहिला आहे. दि.9 पर्यंत पॉझिटिव्हीटी हा दहाच्या खाली होता. मात्र, दि.10 रोजी वाढला असून दि.11 रोजी जाहीर झालेल्या अहवालात 15.04 वर पॉझिटिव्हीटी पोहचली आहे. हा पॉझिटिव्हीटी कमी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुक्तीचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न
कोरोना बाधित आढळून येण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उपचार घेणारे कमी आणि त्या तुलनेत मुक्तीचे प्रमाण होते. कोरोना मुक्त केवळ 14 जण कोरोना मुक्त झालेले आहेत.
लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र प्रत्येकाच्या खिशात
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नव्याने निर्बंध लागू करताच जिल्ह्यातील नागरिकांना कामानिमित्त जायचे असल्यास लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. प्रमाणपत्र असेल तरच मुभा मिळत असल्याने प्रत्येक जण लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र खिशात ठेवत आहे.
मंगळवारी
नमुने-2513
बाधित-378
मंगळवारपर्यंत
नमुने-24,08,483
बाधित-2,54,738
मृत्यू-6502
मुक्त-245325









