अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 28 मार्च 2022, सकाळी 11.00
● कराड तालुका 1
● पाटण तालुका 1
● स्वॅब तपासणी 254
● पॉझिटिव्हिटी 0.79
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात बाधित वाढ रोखली गेली आहे. जिल्हा कोरोनामुक्त झालेला आहे. तरीही बाधितवाढ ही एक ते दोनच्या दरम्यान आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात कराड आणि पाटण तालुका या दोन तालुक्यात दोन जण बाधित आढळून आले असून, काल दिवसभरात 254 जणांची स्वॅब तपासणी केली. 0.79 वर पॉझिटिव्हिटी रेट आहे.
सक्रिय रुग्ण 21 च्या खाली
जिल्ह्यात बाधित वाढ पूर्णपणे रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबतीने मेहनत घेतली. त्यात यश आले असून, जिल्ह्यातील सध्या 254 जणांचे स्वॅब रविवारी तपासणी करण्यात आले. काल केवळ 21 जण सक्रिय रुग्ण असून 1 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दोन तालुक्यातच केवळ एक जण बाधित
नव्यानं जिल्ह्यातील दोन तालुक्यात केवळ प्रत्येकी 1 असे दोन बाधित आढळून आले असून इतर 9 तालुक्यात एक ही रुग्ण आढळून आला नाही. त्यामध्ये कराड 1, पाटण 1 असे आहेत. त्यामुळे आतापर्यंत तालुकानिहाय आणि कंसात आतापर्यंत मृत्यू:- जावली 10,665 (234), कराड 44,610 (1,290), खंडाळा 15,910 (201), खटाव 27,928 (679), कोरेगाव 23,639 (533), माण 19, 280 (432), महाबळेश्वर 5,365 (91), पाटण 11,259 (390), फलटण 40,632 (719), सातारा 60,256 (1,597), वाई 17, 539 (418), इतर 3,157 (99), एकूण 2,80,240 (6,683).
सोमवारी
नमुने-254
बाधित-2
सोमवारपर्यंत
नमुने-25,70,617
बाधित-2,79,194
मृत्यू-6683
मुक्त-2,71,792









