सांगली/प्रतिनिधी
मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या महिन्यात जीएसटीचे कलेक्शन ४८२ कोटी इतके होते यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०२१ चा महसूल ५७० कोटी इतका झाला आहे. मागील वर्षी पेक्षा आता आठ महिन्यात जीएसटी महसुलात सुमारे र ८८ कोटीची म्हणजेच १८ टक्के वाढ झाली आहे. अशी माहिती सांगली जीएसटी कार्यालयाकडून देण्यात आली.
डिसेंबर २०२० पासून सुरु झालेला जीएसटी वाढीचा ट्रेंड कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जून २०२१ चा अपवाद वगळता कायम असला तरी आता वाढीचा दर मंद होऊन जिल्ह्याच्या नोव्हेंबर २०२१च्या जीएसटी संकलनात मध्ये मागील नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत थोडीशी वाढ दिसते आहे . मागील वर्षी नोव्हेंबर २०२० या महिन्यात जीएसटीचे महसूल ६९ कोटी इतके होते. तर आता नोव्हेंबर २०२१ चा महसूल हा ७४ कोटी इतकाच नोंदला गेला. जीएसटी महसुलात सुमारे ५ कोटीची म्हणजेच ६ टक्के वाढ झाली आहे.
देशात नोव्हेंबर २०२१ मध्ये जीएसटीचा एकूण महसूल १३१५२६ कोटी आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्या च्या १०४९६३ कोटी महसुलाच्या तुलनेत २५ टक्के जादा कर संकलन या महिन्यात झाले. नोव्हेंबर, २०२१ च्या संकलनाने गेल्या महिन्यातील संकलनाला मागे टाकले आणि हा कर लागू झाल्यापासून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक महसूल संकलनाची नोंद केली.
महाराष्ट्राचा विचार करत असताना नोव्हेंबर २०२१ मध्ये जीएसटीचा एकूण महसूल, १८६५६ कोटी आहे . गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्या च्या १५००१ कोटी महसुलाच्या तुलनेत २४ टक्के इतके जादा कर संकलन या महिन्यात झाले.