प्रतिनिधी / सातारा :
बारावीच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, जिल्ह्यातील 222 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करत 37 हजार 508 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव, एसटी बसचा संप आणि ऑनलाईन शिक्षण यामुळे परीक्षा देण्याबाबत विद्यार्थ्यामध्ये संभ्रम अवस्था पहायला मिळत आहे. यात ऑफलाईन होणाऱ्या परीक्षा आणि गुणांचे सुत्र जुळवण्यासाठी विद्यार्थ्यासह पालक ही अभ्यासावर जोर देत आहेत. येत्या 4 मार्च पासून 12 वीची परीक्षा सुरू होणार आहे. विद्याथी लसवंत झाल्याने अनेकांची कोरोनाची भीती कमी झाली आहे. वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्र निश्चित होत आहेत. सातारा जिल्ह्यातील 222 केंद्रावर 12 वीची परिक्षा होणार आहे. तसेच 37 हजार 508 विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत. शिक्षण विभागाने परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरारी पथकांची स्थापना केली आहे. या परीक्षा प्रक्रियेसाठी 130 हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.









