प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत परिसरातून तसेच संपूर्ण जिल्ह्यातून परप्रांतीय कर्मचारी लॉक डाउन झाल्यानंतर आपल्या गावी निघून गेले, जवळपास आकडेवारीनुसार 54 हजार हजार लोक हे आपल्या गावी निघून निघून गेले आहेत. ही शासकीय आकडेवारी असून यामध्ये मोटरसायकलवरून काही चालत शिवाय अन्य मार्गाने बरेच लोक गेले असून 1 लाख लोकांना आता नोकरीची संधी आहे, त्यामुळे उद्योजकांनी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य द्यावे असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी व्यक्त केले, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन येथे आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला गोशिमा चेअरमन सचिन शिरगावकर, अजित आजरी, सुरजीतसिंह पवार, नितीनचंद्र दळवाई ,जिल्हा महाव्यवस्थापक उद्योग केंद्र सतीश शेळके, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र जमीर करीम. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विलास सोनवणे, सरकारी कामगार अधिकारी राहुल तोडकर व यशवंत हुबे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुजित चव्हाण, विनोद खोत ,राजू यादव, विराज पाटील यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोशिमा अध्यक्ष शिरगावकर म्हणाले आम्ही नोकरी देताना जास्तीत जास्त स्थानिकांनाच प्राधान्य देतो ,शिवाय बरेच कामगार हे स्थानिकच आहेत ,मशीन शॉप मध्ये काम करणारे जवळपास सर्वच कर्मचारी स्थानिक आहेत, फक्त फाँड्री साठी लागणारे मजूर हे परप्रांतीय आहेत यामध्ये स्थानिक सुद्धा बरेच कर्मचारी आहेत .पण कठीण काम असल्याने थोडेसे स्थानिक कर्मचारी त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे हे काम परप्रांतीय आपल्या हातात घेतात, यावेळी स्थानिकांनी मन लावून काम केले तर निश्चितच परप्रांतीय कामगारांची आपल्याला गरज भासणार नाही, शिवाय आपली एमआयडीसी ही गेल्या चार मे पासूनच सुरू सुरु झाली आहे .यामध्ये आज पन्नास ते साठ टक्के काम चालू आहे, हे पूर्वपदावर येण्यासाठी पुणे मुंबई ही शहर चालू होणे अत्यंत गरजेचे आहे. आमच्याकडे येणारे कामगार हे सांगली. कर्नाटक हद्दीतील येणारी गावे गारगोटी ..भुदरगड . गडिंग्लज या भागातून येणारे कामगार मोठ्या प्रमाणात आहेत ,हे कामगार थांबल्यामुळे कारखाने अत्यंत कमी कामगारांच्या जोरावर चालू आहेत .त्यामुळे लवकरात लवकर जिल्हा बंदी व कर्नाटक व महाराष्ट्र सिमा रेषेतील असलेल्या गावांमधील कामगारांना येण्याची सूट देण्यात यावी अशी मागणी यावेळी गोशिमा चे चेअरमन शिरगावकर यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्याकडे केली.