सातारा / प्रतिनिधी :
राज्य शासनाने दि.12 रोजी उशीरा राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील मेढा, कराड, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचीही बदली झाली आहे. अविनाश फडतरे, जावलीचे गटविकास अधिकारी सतीश बद्दे यांच्या बदलीमुळे प्रचंड नाराजीचा सुर उमटत आहे.
राज्य शासनाने दि. 12 रोजी राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
त्यामध्ये जावलीचे गटविकास अधिकारी सतीश बद्दे यांची जावलीहून पुणे येथे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात व्याख्याता म्हणून बदली झाली आहे. कराडचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची वाळवा येथे बदली झाली. लातूरहून उदयसिंह साळुंखे हे खटाव येथे बदली झाली . तसेच सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची बदली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत बीड येथे झाली आहे.