जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ प्रवीण मुंढे यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विशेष कारागृहातील 13 कैद्यांना 45 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े राज्य शासनाकडून अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिल़ी
मागील काही दिवसांपासून दुचाकीवरून अनावश्यक लोक फिरताना आढळून येत आहेत. यासाठी दुचाकींना आता शनिवार रात्री 12 वाजल्यापासून जिल्हाधिकाऱयांनी शहरी भागात दुचाकींना बंदी केली आह़े त्याची कठोर अंमलबजावणी पोलिसांकडून करण्यात येईल, असेही यावेळी डॉ. मुंढे यांनी यावेळी सांगितल़े मात्र ज्यांना बाहेर फिरणे अत्यावश्यक आहे, अशांसाठी पासची सुविधा करण्यात आली आह़े ज्या नागरिकांना पास हवे आहेत, त्यानी शासकीय कार्यालयात गर्दी करू नका. पोलिसांतर्फे ऑनलाईन फॉरमॅट आणि सिस्टिम सुरू झाली आहे. त्यासाठी लिंक प्रसिध्द केली जाणार असून क्युआर कोड स्वरूपात पास असेल आणि प्रिंटची गरज लागणार नाही
covid19mhpolice.in या लिंकवर नागरिकांना पास उपलब्ध करून दिले जात आहेत. कुणाची काही तक्रार असेल तर 100 वर कॉल करावा, असे आवाहन डॉ. मुंढे यांनी केले. रत्नागिरी जिह्यात खाडीपट्टय़ातील देशामध्ये काम करणारे नागरिक मोठय़ा प्रमाणात परतले आहेत. तसेच मुंबई येथूनही लोक जिह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा संवेदनशील मानला जात आहे. आतापर्यंत केवळ 1 कोरोनाबाधित रुग्ण आपल्याकडे आढळला असून ही संख्या रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.









