प्रतिनिधी/ सातारा
रुग्णांना सेवा देण्यासाठी परिचारिका कार्यतत्पर आहेत म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवर सदैव पाठिशीच असतात. पण समाजाने या महिला परिचारिका यांचाही नेहमी आदर राखण्याचे आवाहन राम जाधव यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या अधिसेविका कार्यालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राम जाधव यांच्या हस्ते, पत्रकार हरीष पाटणे यांच्या उपस्थितीत अधिसेविका वैशाली बोबडे, अधिपरीचारिका गीतांजली पवार, मोहिणी कुरुलरेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विविध मान्यवरांनी यावेळी उपस्थित परिचारिकाना शुभेच्छा देण्यात आल्या.









