आणखी तेरा पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 406 वर : आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज, 284 ‘कोरोना’मुक्त : जिह्यात 114 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिह्यात आणखी तेरा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डबॉयला ‘कोरोना’ची बाधा झाली आहे. यापूर्वी तीन नर्सना ‘कोरोना’ची बाधा झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. दरम्यान, जिह्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 406 वर गेली आहे. तर चार रुग्णांना रविवारी डिस्चार्ज दिल्याने आतापर्यंत 284 रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
शनिवारी रात्री उशिरा तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये काम करणाऱय एका वॉर्डबॉयचा समावेश आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील एक आणि सातार्डा येथील एक आहे. जिह्यात आतापर्यंत 406 रुग्ण सापडले आहेत. रविवारी आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 284 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 101 रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ. क्र. विषय संख्या
1 तपासण्यात आलेले एकूण नमुने 6,485
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने 6,320
3 जिह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 393
4 जिह्याबाहेरील रुग्ण 3
6 एकूण रुग्णसंख्या 406
7 निगेटिव्ह आलेले नमुने 5,932
8 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 165
9 सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 114
10 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6
11 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 284
12 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 129
13 रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 5,146
14 संस्थात्मक विलगीकरणातील एकूण व्यक्ती 18,730
15 2 मेपासून आतापर्यंत जिह्यात दाखल व्यक्ती 1,67,156
16 सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 37
ओसरगाव-सडेवाडी येथे कंटेनमेंट झोन
कणकवली तालुक्यातील ओसरगाव-सडेवाडी येथे 100 मीटर परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.
सदर झोनमध्ये 14 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रात नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन
करणाऱयाविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे
आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









