प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून येत आहेत.ते ही कोणा बाधितांच्या संपर्कात आल्याने बाधा होऊन उपचार घेत आहेत.शहर व उपनगरातला कोरोनाचा विळखा कायम आहे. ज्या जिल्हा रुग्णालयात काम करणाया आरोग्य सेविका यापूर्वी बाधित होत होत्या, आता महिला सफाई कर्मचारी बाधित होऊ लागल्या आहेत. दोन जणींना बाधा झाली आहे.त्या सहा दिवसापासून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत आहेत.ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत.
रात्रीच्या अहवालात अनेक वेगवेगळ्या गावांची नावे दिसू लागली आहेत.शहरातील बाधित रुग्ण आढळून येत आहेत.ज्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात सफाई व झाडू काम करणाया 30 वर्षीय महिलेला सहा दिवसापासून थंड, ताप, घशात खवखव होत होती.ती उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.तिचा अहवाल बुधवारी रात्री येताच पॉझिटिव्ह असल्याचे समजले.आणखी एक 25 वर्षीय महिला याच रुग्णालयात बाधित आढळून आली आहे.तसेच शहरात निकट सहवासात आलेले सातारा येथील 38 वर्षीय महिला, सदाशिव पेठ येथील 25 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 79 वर्षीय पुरुष,सदरबझार, सातारा येथील 19 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, सातारा येथील 51 वर्षीय पुरुष,गोडोली, सातारा येथील 45 वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जकातवाडीत झाले सात बाधित
सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतर जकातवाडी येथील नोकरी, कामानिमित्त, व्यवसायानिमित्ताने सातारा शहरात जाऊ लागले.शहरात ते नेमके कुठं कुठं गेले याचे त्यांना आठवत नाही परंतु शहरात त्यांना कोरोनाची बाधा झाली.दोन दिवसात सात बाधित झाले आहेत.गुरुवारी एक जण बाधित झाला आहे.जकातवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 54 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष असे बाधित झाले आहेत.
चिंचणेर वंदनमध्ये दोन बाधित
चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणारे चिंचणेर वंदन या गावात दोन बाधित आढळून आले आहेत.त्यांची हिस्ट्री एवढी सापडत नसून दवाखान्यात त्या उपचारासाठी जात असल्याने त्यांना त्रास जाणवू लागला होता.दोन रुग्ण आढळून येताच गावात शिबिर घेतले असून डॉ.शशांक पाटील हे मार्गदर्शन करत आहेत.
लिंब येथे दोन रुग्ण
रुग्णालयात उपचारासाठी गेलेली महिला आणि तिचे बाळ बाधित झाले आहे. अगोदरच गावात पंचायत समिती सदस्य जितेंद्र सावंत हे ग्रामदक्षता समितीला सोबत घेऊन काम करत आहेत.कोरोना होऊ नये म्हणून ते धडपडत आहेत.मात्र, दवाखान्यात उपचारासाठी गेलेलेच बाधित होऊन येत आहेत.
डबेवाडीतल्या एकाचा मृत्यू?
डबेवाडी येथील एक जण पुण्याला गेला होता.तेथेच कोरोना झाला अन त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे.दरम्यान, खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यामध्ये डबेवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे.
ग्रामीण भागात शिरकाव
वासोळे येथील 52 वर्षीय पुरुष, वरणें येथील 60 वर्षीय महिला, पोगरवाडी येथील 39 वर्षीय महिला, कुमठे येथील 51 वर्षीय पुरुष, तारगाव येथील 17, 21 वर्षाची महिला, कृष्णानगर, सातारा येथील 46 वर्षीय पुरुष.
तर खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यामध्ये कोंढावळे लिंब येथील 42 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील 75 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.तसेच कोरोनामुक्तीचे प्रमाण तेवढेच आहे.









