उद्यापासून शिवभोजन : आमदारांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयात शिवभोजन योजना सुरू करण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीची पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दखल घेऊन तात्काळ जिल्हा रुग्णालयातील कँटिन सुरू केले. त्याचबरोबर या कँटिनमध्ये सोमवारपासून शिवभोजन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आमदार नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने दुकाने व हॉटेल बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची व सोबत येणाऱया व्यक्तींच्या जेवणाची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील कँटिन सुरू करून शिवभोजन योजना सुरू करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. आमदार नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून हे कँटिन सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर या कँटिनमध्ये सोमवारपासून शिवभोजन योजना सुरू करण्यात येणार आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानुसार तालुक्मयात शिवभोजन केंदे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत केवळ 5 रुपयांत शिवभोजन गरीब व गरजूंना दिले जात आहे. या निर्णयामुळे गरीब व गरजू व्यक्तींना दिलासा मिळाल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.









