प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या सातारा जिह्यात जिल्हा महिला कॉगेसच्या तालुका निहाय निवडी पार पडल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस उपस्थित होत्या.
त्यांच्या निर्देशानुसार सातारा महिला काँग्रेस कमिटीत सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा धनश्री महाडिक यांनी फलटण तालुका अध्यक्षा पदी सुजाता गायकवाड व माण तालुका अध्यक्षापदी नकुशा जाधव यांची नियुक्ती केली. तसेच इतर पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी पदाधिकाऱयांना सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव व महिला अध्यक्षा धनश्री महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी रजनी पवार, महेंद्र सुर्यवंशी बेडके, बाबासाहेब कदम, नंदाभाऊ जाधव, मनोजकुमार तपासे, मालन परळकर, सुषमा राजेघोरपडे, रजिया शेख, मंजिरी पानसे, बानू शेख व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.









