प्रतिनिधी / बेळगाव :
जिह्याच्या राजकारणाचे प्रमुख केंद्रबिंदू मानलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. त्यामुळे आता जिह्यातील राजकीय मंडळी आपले वजन दाखविण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करणार हे निश्चित झाले आहे. 7 ऑगस्ट रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे.
यानिवडणुकीसाठी सहकार खात्याच्या आयुक्तांनी निवडणूक रिटर्निंग ऑफीसर म्हणून सईदाआफ्रीन एस. बळ्ळारी यांची नियुक्ती केली आहे. 30 जुलैला अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 31 जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर दुसऱयाचदिवशी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी अर्ज माघारीचा दिवस आहे. त्यानंतर 7 ऑगस्टला ही निवडणूक होणार त्यानंतर लागीच निकालही जाहीर होण्याची शक्मयता आहे.
आता निवडणूक जाहीर झाल्याने संपूर्ण जिह्याचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. यावेळी कोण बाजी मारणार हे आता लवकरच समजणार आहे. एकूणच पुन्हा एकदा विविध सहकार खात्याच्या निवडणूका जाहीर झाल्याने निवडणुकीची रंगीत तालीम सुरु होणार आहे.









