जिल्हा उपाध्यक्ष कविता कचरे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
प्रतिनिधी/ सातारा
भाजपला जिह्यात एका बाजूला चांगले दिवस आले असले तरीही राज्यात भाजपची सत्ता गेली तेव्हापासून नाराजीचा सूर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.विधानसभा निवडणुकीत काही खेळया झाल्या त्यावेळी नाराज झालेले आज ही भाजपवासी आहेत.आता पदाधिकारी निवडीत प्रमोशन देण्याऐवजी ग्रास रूटला काम करणायांचे डीमोशन केले आहे.असा ठपका ठेवून भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्षा कविता कचरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याकडे व्हाट्सअपद्वारे पाठवला आहे.तर प्रत्येक कामात निष्ठेने पळणारे पदाधिकारी यांना ही डावलले गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी सातारा जिह्यात भाजपमध्ये जोराची भरती सुरू झाली होती.ज्यांनी काम केले अशा काहींना डावलले गेले.त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर काहीजण तटस्थपणे राहिले.तरीही जिह्यात भाजप क्रमांक दोनचा पक्ष बनला.निवडणुकीनंतर बरेच पुलाखालून पाणी गेले.पाण्यात कोण मनमुराद पोहले तर कोणी गटखाळ्या खात तग धरून आहेत.नुकत्याच पदाधिकारी निवडी पार पडल्या.या निवडीमध्ये ही जे पक्षाचे निष्ठेने काम करतात त्यांना मात्र आहे त्या पदावरून खालच्या पदावर नियुक्ती केली गेली तर काहींचा विचार ही केला गेला नाही.त्यामुळे नाराजी नाटय़ सुरू झाले.महिला जिल्हाध्यक्ष कविता कचरे यांनी नाराजीमध्ये आपला राजीनामा व्हाट्सअपवर लिहला अन तो जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना पाठवला.कविता कचरे यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले की आमच्या घरात अगदी लहान मुलापासून जेष्ठ व्यक्तीना फक्त भाजप हा पक्ष माहिती आहे.गेल्या पंधरा वर्षात पदरमोड करून पक्षाची कामे केली आहेत.कामे करायला आम्ही पुढे आणि ज्यांच काहीच काम नाही ते पदाला पुढे.त्यांच्या घरातील व्यक्ती एक एकीकडे तर दुसरे भलतीकडे असतात.पक्षाच्या विरोधात काम केले जाते अशा व्यक्तींना राज्यावर पाठवले जाते.आम्ही निष्ठेने काम केले.यापूर्वी जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा, फादर बॉडी चिटणीस, प्रदेश कार्यकारणी सदस्य महिला मोर्चा अध्यक्ष, आणि आता जिल्हा उपाध्यक्ष असे डीमोशन केल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच जिह्यातील नाराज असलेल्यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष अविनाश फरांदे, अनुप सूर्यवंशी, विजय काटवटे यांच्यासह नाराज आहेत,असे समजते.त्यामुळे नाराज नाटय़ कुठपर्यंत पक्षात रंगणार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हे काय उपाय करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.








