प्रतिनिधी/ म्हसवड
कुळकजाई विकास सेवा सोसायटी मध्ये जिल्हा बँकेच्या संचालक निवडणूकिसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी येऊन मी सांगेल त्याचा ठराव करायचा अशी दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन गेले असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात सुनंदा शेडगे यांनी दिली आहे. तर भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी अपरात्री घरी येवून नवर्यास सांग समजुन माझ्या विरोधात गेला तर जीवे मारीन अशी दमदाटी व शिवीगाळ केल्या प्रकरणी सुरेखा बुधावले यांनी दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.असुन या गोरे बंधूच्या ठरावाच्या राडय़ाने सोमवारी ऐन बाजारा दिवसी पोलिस बंदोबस्तामुळे दहिवडीत संचारबंदी सारखी परिस्थिति निर्मान झाली असली तरी कुळकजाई सोसायटीच्या संचालकाचा ठराव शेवटी सेनेचे शेखर गोरेनी यांच्या समर्थकाचाच मंजुर झाला
या बद्दल अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यापासून जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे विकास सेवा सोसायटी ठराव प्रक्रिया चालू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी वादा वादी सारखे प्रकार होत आहेत राणंद येथे ही गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीच्याच दोन गटात धुमशान झाले होते.
कुळकजाई विकास सेवा सोसायटी मध्ये जिल्हा बँकेच्या संचालक निवडणूकिसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना. त्या ठिकाणी शेखर गोरे यांच्या सोबत सुनील जाधव, बशीर मुलानी, राजा जाधव, अमर कुलकर्णी, आप्पा बुधावले व इतर जाणंनी येऊन दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन जात असताना सुनंदा शेडगे या आडव्या गेल्या व म्हणाल्या आमची माणसं कोठे हि न्यायची नाहीत त्यांना सोडा नाही तर मी इंथच भितीला टकरा घेईन असे म्हणत असताना मला धक्काबुक्की करत आमची माणस गाडीत घालून निघून गेली असा अपहरणाचा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्यात दाखिल करण्यात आला. तर आमदार जयकुमार गोरे व त्यांचे 4 कार्यकर्ते यांनी काल मध्यरात्री एक वाजता सुरेखा बुधावले यांच्या घरी जाऊन ’तुज्या नव्रयाला सांग तो माझ्या विरोधात जातोय त्याला सुट्टी देणार नाही मर्यादा कुठं मारुन टाकलेलं ही कळू देणार नाही असे म्हणत सोबत आलेल्या माणसांकडे पहात त्याला सोडायचे नाही असे म्हणून गाडीत बसुन गेले अशी जिवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली असल्याचा गुन्हा सुरेखा बुधावले यांनी दाखल केला आहे. दहिवडी पोलिस ठाण्याच्या आवाराला व दहिवडी न्यायालयाला पोलिस छावणीचे स्वरुप आल्याने दहिवडीत ऐन बाजार दिवसी संचारबंदी लागू केल्याचे चित्र दहिवडी न्यायालय परिसरात दिसत होते माणखटावचे उपविभागीय पोलिस अधिकारी बी बी महामुनी, पोलिस उप अधीक्षक, औंध, दहिवडी, म्हसवडचे अधिकारी व कर्मचारी, निर्भया पथक, दंगा काबू पथकाचे कर्मचारी उपस्थित होते दहिवडी ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ अधिक छपास करत आहेत.









