प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनल रचनेवरून प्रत्येक क्षणाला राजकीय समीकरण बदलू लागले आहे दिवसभर फक्त चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत प्रत्येक बैठकीनंतर नवीन मुद्दा पुढे आल्याने डोकेदुखी वाढली आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पालकमंत्र्यांवर सडकून टीका केल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासाठी गणपतराव पाटील यांनी थांबावे यासाठी शेट्टी यांनी शिष्टाई करावी त्यानंतर स्वाभिमानीला एक जागा देण्याचा विचार करू असा निरोप आमदार विनय कोरे प्रकाश आवाडे प्राध्यापक जयंत पाटील यांच्यामार्फत शेट्टी यांना देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये शेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र हा प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावला कोणत्याही परिस्थितीत गणपतराव पाटील माघार घेणार नाहीत. अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील डॉक्टर अशोकराव माने संदीप कारंडे उपस्थित होते.