कोल्हापूर/प्रतिनिधी
पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील व खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यानिवडणुकीसाठी आज सकाळी 8 पासून मतदानाला सुरुवात झाली.
दरम्यान, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान सुरु असून सकाळी दहा वाजेपर्यंत १,३४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली तेव्हापासून पहिल्या दोन तासांत १७.६१ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढणार आहे. तर आजरा केंद्रावर सुरु असणारे मतदान पूर्ण झाले आहे.









