बेळगाव : पोलीस म्हटले की जनता दोन पाऊल मागेच हटते. पोलीस खात्याकडे जाताना प्रत्येकाच्याच मनात एक भीती असते. मात्र, काही वेळा पोलिसांनाही भीती काय असते याची जाणिव घडते. नुकतेच जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात साप दिसल्यामुळेच कर्मचाऱयांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी तो साप शिताफीने पकडला.
आनंद चिठ्ठींनी जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात साप म्हटल्यानंतर तातडीने जाऊन तो साप तब्बल तासभर प्रयत्न करून पकडला व आपल्या माणुसकीचे दर्शन घडविले. पकडलेला साप 3 फूट लांब व धामण जातीचा बिनविषारी होता. भक्ष्याच्या शोधात कार्यालयात शिरला असावा. त्यानंतर तो काही जणांच्या दृष्टीला पडला. पहिल्या मजल्यावर हा साप सापडल्याने साऱयांनीच आश्चर्य व्यक्त केले.









