ओटवणे / प्रतिनिधी:
कोलगावचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांची जिल्हा परिषदेतील महत्वाच्या अशा स्थायी समितीवर बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. मायकल डिसोजा गेले दोन दशके कोलगाव पंचक्रोशीत समाजकारण करत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातुन व त्यांच्या पाठपुराव्यामुळे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आला आहे. या सर्व कामाची दखल घेऊन खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जि प गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी मायकल डिसोजा यांची या पदासाठी शिफारस केली.
या निवडीबद्दल सावंतवाडी तालुक्यातील तसेच कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मायकल डिसोजा यांचे अभिनंदन केले आहे.
Previous Articleअंधश्रद्धेने दोन कोवळय़ा जीवांचा बळी!
Next Article समस्या वॉटर रीटेन्शनची









