प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कोण काय काय करते. काम नेमके कोण करते, कोण बाहेर फिरते टेबलवर नेमके कोण कार्यरत आहेत, याची सर्व माहिती घेण्याकरता आज अचानक जिल्हा कृषी अधिकारी विनायक पवार यांनी भेट दिली अन् कामकाजाची पहाणी केली. त्यांनी दिलेल्या भेटीमुळे व कामकाजाची पाहणी करत काहींजणांना नोटीस बजावण्याची सुचना केल्याने चांगलीच धावपळ उडाली.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात सगळेच अधिकारी आणि कर्मचारी हे बेसावत असताना अचानकपणे बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कृषी अधिकारी विनायक पवार यांनी सरप्राईज व्हिजीट दिली. यामध्ये काहींच्या संगणकावर नेमके काय काम चालते हे तपासले. त्यामुळे कृषी विभागात चांगलीच तारांबळ दुपारी उडाली होती. काहीजण जेवायला जाण्याच्या गडबडीत होते. परंतु तेवढय़ात साहेबच विभागात आल्याने हलताही येत नव्हते. तर विभागात आल्यानंतर पवारांनी थेट एका कर्मचाऱयांच्या संगणकावरी कामाची तपासणी केली. चुकीचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधितास नोटीस पाठवण्याच्या सुचना दिल्याचे समजते.








