कोल्हापूर/ प्रतिनिधी:
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ मंगळवारी तपासली असता यामध्ये 77 कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्याचे आढळून आले आहे. या कर्मचाऱ्यांना नोटीस काढून यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
सोमवारी बांधकाम विभागातील पाच कर्मचारी कार्यालय कामकाज वेळ संपण्याआधीच निघून गेले होते .त्यामुळे मंगळवारी कोण कर्मचारी वेळेत येतात आणि वेळेत जातात याची तपासणी केली असता वेळेत न येणाऱ्या कर्मचायांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आले.संबंधित विभागातील उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबत कक्ष अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विभाग नुसार उशीर आलेले कर्मचारी असे आहेत ग्रामपंचायत विभाग 2, बांधकाम 6, ग्रामीण पाणीपुरवठा 4, वित्त विभाग 10, आरोग्य 16, एनआरएचएम 15, शिक्षण माध्यमिक 2, शिक्षण प्राथमिक 9, डी आर डी ए 1, कृषी 5, महिला व बालकल्याण 2, पाणीपुरवठा व स्वच्छता 4, एम आर जी एस 1, असे एकूण 77 कर्मचारी मंगळवारी कार्यालयात उशिरा पोहोचले आहेत. आता या वेळाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. मात्र ही कारवाई जुजबी होणार की कडक कारवाई होणार आहे.
Previous Articleचीनने बळकावली नेपाळची 33 हेक्टर जमीन
Next Article दूध उत्पादकानांही मिळणार किसान क्रेडिट कार्डचा लाभ








