प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य शासनाच्या इतर निवृत्त कर्मचाऱयांचे (पेन्शनर) निवृत्ती वेतन दर महिन्याच्या 1 तारखेला जमा होत असताना जिल्हा परिषदेच्या सेवा निवृत्ती कर्मचाऱयांना मात्र निवृत्ती वेतनाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. पेन्शनवरच वृद्धापकाळातील रोजचे जगणे जीवन अवलंबून असणाऱया जि. प. च्या पेन्शनरांना तुमची बिले काढून तयार आहेत, पण राज्य शासनाकडून अनुदान आले नसल्याची उत्तरे जिल्हा परिषदेकडून दिली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी समितीचे अध्यक्ष विश्वास साबळे यांनी विश्वास साबळे यांनी केला आहे.
या संदर्भात साबळे यांनी निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त कर्मचाऱयांची पेन्शन नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या 1 किंवा 2 तारखेस जमा करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहेत. परंतु या निर्देशाप्रमाणे पेन्शन जमा होत नाही. या महिन्याचीही पेन्शन जमा करण्यात आलेली नाही. याबाबत जिल्हा परिषदेकडे विचारणा केली की तुमची बिले तयार आहेत. पण शासनाकडून अनुदान आले नसल्याने पेन्शन जमा केली नसल्याची उत्तरे दिली जात आहेत. शासकीय कर्मचाऱयांची टेझरीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पेन्शन जमा होते. शासकीय कर्मचारी असोत वा जिल्हा परिषदेचे कर्मचारी असोत. हे दोन्ही शासकीय यंत्रणेचा भाग असताना दोन्हींच्या पेन्शन जमा करण्याच्या पद्धतीत तफावत का? असा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या सेवा निवृत कर्मचाऱयांची पेन्शन सुध्दा ट्रेझरी मार्फत व्हावी, आशी आमची मागणी आहे. त्या दृष्टीने कार्यवाही व्हावी, अशी सर्व सेवानिवृत्त जि. प. कर्मचाऱयांची विनंती आहे, असेही साबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.