शहर पोलीस ठाण्यासमोर लावली बॅरिकेट; जिल्हा कारागृहात धावपळ सुरू
प्रतिनिधी/ सातारा
राज्यात आणि देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कारागृहातल्या कैद्यांना पॅरोलवर रजा दिल्या गेल्या आहेत.सातारा कारागृहात मात्र कैदी तसेच असून त्यातल्या दोन कैद्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे उघड होताच जिल्हा कारागृह हलचल माजली आहे.त्या दोन कैद्यांच्या संपर्कात आलेल्या 21 जणांना लगेच आरोग्य यंत्रणेने कोरोनटाइन करण्याची प्रक्रिया सुरू केली.त्या 21 जणांना कारागृहातच खावली येथे कोरोनटाइन करण्याची कायदेशीर चर्चा विनिमय दुपारपर्यंत सुरू होते.कोरोनाचे दोन रुग्ण कारागृहात आढळून आल्याने शहर पोलीस ठाणे आणि कारागृह यांच्या मधोमध बॅरिकेट लावण्यात आल्या आहेत.
कोरोना या महामारीने जगाला ग्रासले आहे.एकत्र येऊ नये, साखळी तुटावी याकरता विलीगिकरण हा उपाय करण्यात येत आहे.देशात आणि राज्यात त्याच पार्श्वभूमीवर जे कारागृह आहेत त्यातील कैद्यांना पॅरोलवर रजा दिल्या आहेत.मात्र, सातारा जिल्हा कारागृहात अजून ही तशा काही हालचाली किंव्हा कारागृह प्रशासनाने कार्यवाही केल्याचे ऐकिवात नाही.मात्र, नुकतेच जिल्हा कारागृहात दोन कैद्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे उघडकीस झाल्याने खळबळ उडाली आहे.जिल्हा कारागृहातले पोलीस कर्मचारी, अधिकारी याच शंकेने त्रस्त झाल्याचे दिसत होते.आरोग्य विभागाने दक्षता म्हणून सातारा जिल्हा कारागृहात आतमध्ये जाऊन सर्व्हे केला.त्या दोन कैद्यांच्या संपर्कात कोण कोण आले त्यांची माहिती घेण्यात आली.21 जण असून त्यांना नेमके कुठं कोरोनटाइन करायचे याबाबत जिल्हा कारागृह प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा चर्चा करत होती.त्या 21 मध्ये 14 कैदी आणि 7 जिल्हा कारागृहातले पोलीस असून त्यांचे स्वब तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, जिल्हा कारागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली आहे.तसेच जिल्हा कारागृहात जे पोलीस झाडाझडती घेतात त्यांचीही तपासणी आता होणार आहे, असे ही जिल्हा कारागृहाकडून सांगण्यात आले.
शहर पोलीस ठाणे अन जिल्हा कारागृह यांच्या मध्ये दुभाजक
इतिहासकालीन असा जिल्हा कारागृह कधी नव्हे ते कोरोनामुळे चर्चेत आला आहे.जिल्हा गृहात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने नजीकच्या सातारा शहर पोलीस ठाण्याच्यावतीने काळजी घेण्याकरता जिल्हा कारागृहाकडे जाण्यासाठी बॅरिकेट लावण्यात आल्या होत्या.शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुरक्षितता महत्वाची मानली जात आहे.
अडीच तासात कारागृह केले निर्जंतुक
जिल्हा कारागृहात पुण्यावरून आलेल्या दोन कैद्याना कोरोना झाल्याचे उघडकीस येताच सातारा पालिका प्रशासनाने दक्षता म्हणून जिल्हा कारागृहात मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या सूचनेनुसार उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने सगळा जेलचा परिसर अवघ्या अडीच तासात हात पंपाने निर्जंतुक करण्यात आला.पालिकेचे चारच कर्मचारी हे काम करत होते.तसेच जिल्हा कारागृहात इतर कैदी आणि पोलीस यांची ही माहिती पालिकेचा आरोग्य विभाग घेत आहे.









