क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा पदवीधर शिक्षण खाते व माऊली पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धेत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर संघाने सौंदत्ती संघाचा तर मुलांच्या गटात बैलहोंगल संघाने सौंदत्ती संघाचा पराभव करून स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले. माऊली पदवीपूर्व महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित या जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धेचे उद्घाटन माऊली महाविद्यालयाचे संस्थापक जयसिंगराव पाटील, प्रमुख पाहुणे विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुला-मुलींच्या 12 तालुका संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. बेळगाव, बैलहोंगल, रामदुर्ग, कित्तूर, खानापूर व सौंदत्ती या तालुक्मयांचा सहभाग होता. मुलींचा अंतिम सामना ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर व सौंदत्ती तालुका यांच्यात झाला. या अंतिम सामन्यात खानापूरने सौदत्ती संघाचा 15-11 अशा गुणफरकाने पराभव करून या स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले. मुलांचा अंतिम सामना बैलहोंगल तालुका विरूद्ध सौंदत्ती तालुका यांच्यात झाला. या सामन्यात बैलहोंगल संघाने 22-18 अशा गुणफरकाने सौंदत्तीचा पराभव करीत स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले. सामन्यानंतर जयसिंगराव पाटील, विठ्ठल हलगेकर, पांडुरंग निलजकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघाना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माऊली महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक पांडुरंग निलजकर, अजय पाटील, प्राध्यापक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.









